रस्त्याने चालत असताना आजूबाजूला, मागेपुढे पाहूनच रस्ता पार करावा : विद्या झिरपे

Foto
सिल्लोड, (प्रतिनिधी) : रस्त्याने चालत असताना आजूबाजूला, मागेपुढे पाहणे नंतरच रस्ता पार करणे, ओलांडणे, प्रवासाला निघताना लवकर निघा व सावकाश जा, शिक्षकांच्या सूचनेचे नियम काटेकोर पालन करा असे आवाहन सहाय्यक पोलिस निरीक्षक विद्या झिरपे यांनी श्री गणेश शिक्षण प्रसारक मंडळ तळणी संचालित सरस्वती माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयात बोलताना व्यक्त केले. रस्ता सुरक्षा अभियान सप्ताह निमित्ताने सिल्लोड वाहतूक पोलिस अधिकारी यांनी शालेय विद्यार्थी यांना मार्गदर्शन केले.

यावळी उपस्थित विद्यार्थी, शिक्षक, पालकांना उद्देशून श्रीमती झिरपे म्हणाल्या की, वाहन चालवताना दुचाकीसाठी हेल्मेट, चार चाकी साठी सिट बेल्टचा वापर प्रवाशांनी करावा, नशा करून (ड्रंक अॅन्ड ड्राईव्ह), मर्यादेपेक्षा जास्त वेगाने वाहन चालवू नका महा मार्गावर अपघाताची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. रस्त्यावर वाहन चालवताना नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन छत्रपती संभाजीनगर महामार्ग पोलिस वतीने केले.

रस्ता सुरक्षा अभियान निमित्ताने विविध माध्यमातून जनजागृतीवर भर देण्यात येत आहे. वाहनचालकांना मोटार वाहन कायद्याची माहिती, महामार्गावरुन जाणाऱ्या वाहनांना तसेच उस वाहतूक बैलगाड्यांना व ट्रॅक्टर ट्रॉली व जुगाड यांना रिफ्लेक्टर बसवणे, अवैध प्रवासी वाहतूक अवजड वाहतूकीवर कारवाई करणे, सुरक्षितपणे शालेय विद्यार्थ्यांचा प्रवास व याबाबत माहिती देणे असे उपक्रम महामार्ग सुरक्षा पथक खुलताबादकडून या सप्ताहात राबवण्यात येत आहेत. 

विद्यार्थीने रस्ता क्रॉस करताना शिस्तीत क्रॉस करावा, वाहन चालकांना त्रास होता कामा नये करिता आम्ही नेहमीच दक्ष असतो. स्वतः शिक्षक लक्ष ठेवून असतात. अभ्यासक्रमातही अशा बाबतीत धडे, पाठ आहेत आणि प्रत्यक्षात सवयीत उतरविण्यासाठी आमचा प्रयत्न राहील अशी ग्वाही प्राचार्य अशोक यांनी दिली. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक विद्या झिरपे, पोलिस उपनिरीक्षक गौतम थोरात, सहायक पोलिस निरीक्षक रामदास वाघ, सोनवणे शांताराम, प्रभाकर वाघसह सरस्वती विद्यालयाचे मुख्याध्यापक शिक्षक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी हजर होते.